चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे हे शिवसेना शिंदे गटात गेले असल्याची बातमी आज एका वृत्तपत्रात झळकाताच. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात एकच खळबळ माजली.अनेकांनी फोन करून या निर्णयाचे काहींनी स्वागत केले तर काहीनी नाक मुरडले .बोद्रे याच्या पक्षप्रवेशला म्हणे खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते.
जाहिरात 👆
सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्या विविध संस्थांवर चौकशीचा दबाव असल्याचे आरोप वारंवार होत होता. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची खमंग चर्चा आहे म्हणे!. सूत्रांच्या हवा ल्याने राहुल बोंद्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्ली व मुंबई येथे दोन गुप्त बैठका घेतल्या होत्या अशी पुंगाणी सुद्धा वाजवण्यात आली. आणि त्या बैठकीनंतरच त्यांच्या प्रवेश करण्यात आला.
बोन्द्रे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर जिल्हाध्यक्ष पदावर संदीप शेळके यांचे नाव पुढे आहे अशी माहिती सुद्धा देण्यात आली. बोद्रे यांचा निर्णयामुळे त्यांचे राजकिय भवितव्यावर संबंधित पत्रकाराने प्रश्न उपस्थित केला.
संबंधित खळबळजनक बातमी नंतर असे कळले की ती एप्रिल फुल वार्ता होती.संबंधित वृत्तपत्राने वाचकांने एप्रिल फुल बनवल्याचे समजल्यानंतर अनेक समर्थकाचा जीव भांड्यात पडला. (ए. फू. वा.)















