Advertisement Advertisement

दारूच्या नशेत महिलेचा छळ; दाताळ्यात दोन जणांवर गुन्हा…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील दाताळा येथे एका महिलेच्या लज्जेस बाधा पोहोचेल असे कृत्य करून शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ४० वर्षीय फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती व तिची मावस बहीण २९ मार्च रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास गावाबाहेर शौचास गेल्या असताना आरोपी समाधान मस्बा भोलनकर (रा. दाताळा, ता. मलकापूर) हा मद्यधुंद अवस्थेत तेथे आला. त्याने फिर्यादीच्या लज्जेस बाधा पोहोचेल अशा प्रकारे बोलून विनयभंग केला.

फिर्यादीने त्याला निघून जाण्यास सांगून विरोध केला असता, त्याचवेळी जानाबाई समाधान भोलनकर (रा. दाताळा, ता. मलकापूर) ही देखील तेथे येऊन शिवीगाळ करू लागली.

या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अप.क्र. ६५/२०२६ नुसार कलम ७४, ७५, ३५२, ३(५) भा.न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार निता मोरे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!