Advertisement Advertisement

डॉ पंढरी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पळसखेड सपकाळ येथे भव्य आयुर्वेदिक रोगनिदान शिबिर; ३४५ रुग्णांनी घेतला मोफत उपचारांचा लाभ..

पळसखेड सपकाळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): श्री गुरुदेव आश्रम, पळसखेड सपकाळ यांच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ मार्च २०२६ रोजी भव्य आयुर्वेदिक रोगनिदान व उपचार शिबिर उत्साहात पार पडले. गंगाई हॉस्पिटल व गंगाई बहुउद्देशीय संस्था, चिखली यांच्या वतीने आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेल्या शिबिरात एकूण ३४५ रुग्णांनी तपासणी करून मोफत आयुर्वेदिक उपचारांचा लाभ घेतला.


या शिबिरात सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार, ए.व्ही.एन., सायटिका, पक्षाघात, फ्रोजन शोल्डर, स्पॉन्डिलायटिस, हात-पाय सुन्न होणे व स्नायू वेदना अशा विविध आजारांवर तज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णांच्या प्रकृतीनुसार स्नेहन, हॉट कॅपिंग, न्युरो-पंचकर्म, विद्धकर्म तसेच अग्निकर्म यांसारख्या आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर करण्यात आला. त्यामुळे अनेक रुग्णांना तत्काळ आराम मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.


शिबिरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आयुर्वेद वाचस्पती, न्युरो-पंचकर्म व वातविकार तज्ञ डॉ. पंढरी उत्तमराव इंगळे यांनी स्वतः उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली व मोफत उपचारासह सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या रुग्णसेवेचे आश्रमातील स्वामीजी यांनी विशेष कौतुक करत आशीर्वाद दिले. समाजहितासाठी अशी आरोग्यसेवा सातत्याने सुरू राहावी, अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.


या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गंगाई हॉस्पिटल व गंगाई बहुउद्देशीय संस्था, चिखली यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुदेव आश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत तपासणी, उपचार व आरोग्य मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाला. भविष्यातही अशाच प्रकारचे मोफत आरोग्य शिबिरे व आयुर्वेद जनजागृती उपक्रम राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!