Advertisement Advertisement

आजाराला कंटाळून १९ वर्षीय युवकाची आत्महत्या; विहिरीत मृतदेह आढळला….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील पिंप्री देशमुख येथील १९ वर्षीय युवकाने दीर्घकाळापासून असलेल्या मिरगीच्या आजाराला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक उर्फ यश सुरेश कराळे (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत सागर एकनाथ कराळे (वय ३२, रा. घाटपुरी) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली.

मृतक प्रतीक याला सन २०१४ पासून मिरगीच्या आजाराचा त्रास होता. त्याच्यावर अकोला येथील डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. मात्र दीर्घकाळ आजाराने त्रस्त झाल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

९ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते १० जून रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पिंप्री देशमुख शिवारातील पवन गरड यांच्या शेतातील विहिरीत तो आढळून आला. त्याला तत्काळ विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी किरण राऊत करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!