Advertisement Advertisement

दगडवाडीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना….

देऊळगावराजा(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील दगडवाडी येथे एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल अजाबराव जायभाये (वय २५, रा. दगडवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास विशाल याने राहत्या घरातील स्लॅबच्या लोखंडी कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही बाब समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.याप्रकरणी सुकदेव कारभारी जायभाये (वय ६२, व्यवसाय शेती, रा. दगडवाडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग क्रमांक १८/२०२६ अन्वये कलम १९४ बीएनएस अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. सदर नोंद ७ मे रोजी दुपारी १२.५० वाजता करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड हे करीत आहेत. अधिक तपास देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!