Advertisement Advertisement

किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेली असता, आरोपीने तिचा हात पकडून घरात नेले व ‘आवाज केल्यास खल्लास करीन! या  प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन, मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी एका २१ वर्षीय युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत असून आरोपी आदित्य (वय २१ वर्षे, रा. खामगाव) हा तिचा वारंवार पाठलाग करत होता. फिर्यादीनुसार, पीडिता किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेली असता आरोपीने तिचा हात पकडून तिला घरात नेले. तेथे आवाज केल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध गैरवर्तन केले. तसेच तिचे मोबाईलमध्ये फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५, ७८, ११५(२), ३५१(२) तसेच पोक्सो कायदा कलम ८, १२ व १७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुसाम करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!