मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील पारपेठ परिसरात ७ वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात ५० वर्षीय आरोपीविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारपेठ येथील पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. २० मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास आरोपी मोहम्मद आबीद मोहम्मद रार याने अल्पवयीन मुलीला दुकानात बोलावले. त्यानंतर दुकानाचे शटर बंद करून मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अप. नं. ३८७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ७४ तसेच पोस्को कायद्याच्या कलम ८ व १० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे करीत आहेत.














