Advertisement Advertisement

मुलीने घरी सांगितले मी बाहेरून जाऊन येते; पण परत आलीच नाही! १५ एप्रिलपासून पोरगी बेपत्ता…

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी मंठा किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शुभम पिंपळगाव आभोरे (रा. शिरपूर लेंडी, जि. जालना) याच्यावर अपहरणाचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संबंधित मुलगी व आरोपी यांच्यात पूर्वी संपर्क होता. १५ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास मुलगी घरातून बाहेर गेल्यानंतर परत आली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या २०२३ च्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध तपास सुरू केला असला तरी तो अद्याप फरार असल्याचे समजते.

दरम्यान, फिर्यादीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच वेळेवर कारवाई न झाल्यामुळे आरोपी मोकाट फिरत असून मुलीचा शोध घेण्यातही विलंब होत असल्याची तक्रार त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्याकडे केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!