चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पंचमुखी महादेव मंदिर परिसरातून एक १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.
दिव्या सुनील जाधव ही तरुणी ३ मे २०२६ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घरा शेजारील स्वामी समर्थ केंद्रात आरतीसाठी गेली होती. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. सर्वत्र शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा न लागल्याने अखेर पोलिसांत मिसिंगची नोंद करण्यात आली.
दिव्याची उंची अंदाजे ५ फूट असून रंग गोरा व बांधा पातळ आहे. ती घरातून जाताना नेव्ही ब्लू रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीज परिधान केलेली होती. तिचे केस लांब असून पायात स्लीपर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार सूर्यकला मस्के करीत आहेत. संबंधित तरुणीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तातडीने चिखली शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













