Advertisement Advertisement

भामट्याने लाज सोडली! घरात एकटीच होती लेकरू; शेजाऱ्यानं केलं घाणेरडं कृत्य, खामगाव शहरातील घटना…!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे एकाच परिसरात शेजारी राहतात. २५ मे रोजी दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना आरोपी तिच्या घरात शिरला. त्याने मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर मुलगी सतत नाराज व अस्वस्थ राहत असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. तिची विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने बाल सहायता क्रमांक १०९८ वर संपर्क साधून मदत मागितली.

त्यानंतर संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. प्राप्त तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!