समृद्धी महामार्गावर अपघात; ५ जखमी..! मदतीला पोलीस… पण वाहनात डिझेलच नाही…? अम्बुलन्स मधून पोलीस घटनास्थळी दाखल

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३०९.४, मांडला परिसरात सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) दुपारी सुमारे २ वाजता भीषण अपघाताची घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार अपघातग्रस्त झाली असून पाच जण जखमी झाले आहेत.

नागपूरकडे जात असलेले एम.एच. ०१ बी.यू. ९९९५ क्रमांकाचे वाहन चालक उद्धव लाडेवार (वय ४०) यांच्या ताब्यातून निसटले आणि अपघात झाला. या अपघातात विजया निमवाड, देवांश लाडेवार, वेदांत लाडेवार, गंगासागर लाडेवार व उद्धव लाडेवार हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिका चालक सुभाष पांचाळ व प्रदीप पळघान, तसेच डॉक्टर अशोक पिसे व मंगेश काळे यांनी जखमींना मेहकर येथील सहयोग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच एपीआय इंगळे, एएसआय खडसे व एमएसएफचे दोन जवान घटनास्थळी रवाना झाले. मात्र येथेच एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरलेली बाब समोर आली.

पोलीस वाहनात डिझेल नसल्याने पोलीस थेट अॅम्बुलन्समधून घटनास्थळी पोहोचले…!

या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा सुरू असून, “समृद्धी महामार्गावर अपघात झाला की मदत तत्काळ मिळते, पण पोलीस वाहनांमध्ये इंधन नसेल तर व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह नाही का?” असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!