मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): नवीन इदगाह परिसरात फोटो काढत असल्याच्या कारणावरून १७ वर्षीय तरुणास शिवीगाळ करून फायटरने मारहाण करत बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सैयद मोहीद मिर सैयद मुश्ताक (वय १७, रा. अहमदशहापुरा पारपेठ) हे मित्रांसोबत फोटो काढत असताना आरोपी अर्शद खान उर्फ गुड्डू अब्दुल खान (वय अंदाजे २८, रा. मदारटेकडी, मलकापूर) याने फोटो काढण्यावरून वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील फायटरने मानेवर व खांद्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध अप. क्र. ८६/२०२६ अन्वये कलम ११८(१), ३५२, ३५१(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे करीत आहेत.














