Advertisement Advertisement

“आई-बाप झोपेत… अन् लेक झोपेचा फायदा घेत घराबाहेर! वडजीतील २० वर्षीय युवती बेपत्ता…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील वडजी येथील २० वर्षीय युवती कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी युवतीच्या वडिलांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मिसिंगची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडजी येथील चंद्रकांत निठकंठ भांरबे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी समिक्षा चंद्रकांत भांरबे (वय २०) ही १६ जुलैच्या रात्री घरातील सर्वजण झोपेत असताना कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. त्यानंतर नातेवाईक, शेजारी व परिसरात सर्वत्र शोध घेतला असता तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.

या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक १५/२०२६ दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता मोरे करीत आहेत.

युवतीचे वर्णन

समिक्षा हिचा रंग गोरा असून उंची सुमारे ५ फूट २ इंच आहे. घरातून निघताना तिच्या अंगात गुलाबी रंगाचा टी-शर्ट, लाल रंगाचा प्लाझो, पायात पांढऱ्या रंगाच्या सँडल, तसेच तिच्याकडे काळ्या रंगाची बॅग, कॉलेजची कागदपत्रे, आधार कार्ड आणि उजव्या हाताच्या बोटात चांदीची अंगठी होती.

अशा वर्णनाची युवती कोणाला आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!