Advertisement Advertisement

“आमचा बाप बांधावर, अन् आम्ही रस्त्यावर!”पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी…..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आरोग्य निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो परीक्षार्थी एकत्र आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यां डॉक्टर ज्योतीताई खेडेकर यांच्या सह MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली.

ग्रामीण भागातील तसेच सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी परीक्षांमधील कथित गैरप्रकारांमुळे खेळ केला जात असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. “आमचा बाप बांधावर अन् आम्ही रस्त्यावर” अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा मांडत, स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे भ्रष्टाचार आणि गैरप्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत, अस डॉ ज्योतीताई खेडेकर ani असा इशारा दिला.

आंदोलक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनातून एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच स्पर्धा परीक्षांच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी आणि डॉ खेडेकर यांनी केली. परीक्षेतील गैरप्रकारांमुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला बुलढाण्यातील विद्यार्थ्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनात थेट सहभागी होतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कथित पेपरफुटीच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!