देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील मेंडगाव येथील श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या 2006 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा “गेट टुगेदर” कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुन्या मैत्रीचे बंध अधिक घट्ट केले.
23 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता विद्यालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमात बॅच 2006 मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जुनी मैत्री… नव्या आठवणी…” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात मित्रांनी एकमेकांची आपुलकीने भेट घेतली. शाळेतील जुन्या आठवणी, वर्गातील किस्से, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शालेय जीवनातील सुवर्णक्षण यांची आठवण काढताना अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भावूकता दिसून आली.
कार्यक्रमासाठी खास आकर्षक बॅनर तयार करण्यात आला होता. “एकच शाळा – एकच स्वप्न – कायमची मैत्री” हा संदेश उपस्थितांच्या मनाला भिडणारा ठरला. यावेळी अनेकांनी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून उपस्थित राहत मैत्रीचा धागा कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
शाळेमध्ये आलेले माजी विद्यार्थी संतोष मानतकर, निलेश कणखर ,अमोल काळुसे ,गणेश गीते, शेख रफिक ,अकबर पठाण ,अथर्बा पठाण, शरीफ पठाण संदीप खाडे, कैलास घुगे ,प्रवीण काळुसे ,देविदास मानतकर ,अमोल मानकर ,पवन मोरे, रवी मानतकर ,भागवत वायाळ ,गणेश मानतकर रवी नागरे ,अनिरुद्ध सानप, धनंजय चव्हाण रामेश्वर डोंगरे गजानन काळुसे भगवान शेळके विलास मानते सतीश गीते ,गीता घुगे गीता काळुसे ,सुनीता गीते, विद्या मुंडे ,ज्योती शिंगणे, त्रिवेणी गीते ,विश्रांती सानप ,शारदा सोनवणे, धनश्री सोनुने वर्षा घुगे दिपाली चव्हाण हे हजर होते…
















