Advertisement Advertisement

अंगणातील दगडावरून शेजाऱ्यांचा चाकू हल्ला; आसोला बु. येथे दाम्पत्य जखमी! क्षुल्लक वादाचे हिंसक रूप; अंढेरा पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल….

मेरा बु. (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील आसोला बु. येथे अंगणातील दगड उचलण्याच्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांनी दाम्पत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना १३ जुलै रोजी घडली. या हल्ल्यात पती-पत्नी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख जावेद शेख कादर (वय ५४, व्यवसाय – शेती, रा. आसोला बु., ता. चिखली) हे आपल्या घराजवळ असताना अंगणातील दगड उचलण्याच्या कारणावरून शेजारी शेख दस्तगीर शेख आलमगीर व समीना बी दस्तगीर शेख यांच्याशी वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन आरोपींनी संगनमताने चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात शेख जावेद तसेच त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर, गळ्यावर आणि उजव्या हातावर चाकूचे वार करण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अहवाल व फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे अंढेरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २३२/२०२६ अन्वये आरोपी शेख दस्तगीर शेख आलमगीर व समीना बी दस्तगीर शेख, रा. आसोला बु., ता. चिखली यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, देऊळगाव राजा, पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे तसेच पीएसआय दिनेश घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय दिनेश घुगे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!