मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्यूज):
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटोडा येथे ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ३५ वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
काटोडा येथील रहिवासी विठ्ठल लहाने व त्यांची पत्नी रूपाली लहाने असे संबंधित दाम्पत्य असून त्यांना एक मुलगी आहे. विठ्ठल लहाने हे मोलमजुरीच्या कामासाठी शेतात गेले असताना घरात कोणीही नसल्याची संधी साधून रूपाली लहाने यांनी राहत्या घरात हा प्रकार घडविल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.
घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. यावेळी गावातील महिला व पुरुष घटनास्थळी जमा झाले. पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती अंढेरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच बिट जमादार पोफळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचासमक्ष पंचनामा केला.
या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.













