Advertisement Advertisement

स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम; मलगी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील मलगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्था, चिखली यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी राबविण्यात येणारा हा उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला.

या उपक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी आई किंवा वडील यांचे छत्र गमावले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी संस्था उचलत असून, इतर सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाची गोडी वाढावी आणि कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नंदकिशोर जाधव सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखली तालुकाध्यक्ष मा. सचिन किसन सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पवार, व्हॉईस ऑफ डिजिटल विंग मीडिया चिखली तालुकाध्यक्ष ऋषि भोपळे, सामाजिक नेते प्रसन्न घुबे, गजानन जाधव, सरपंच विनायकराव साप्ते, दिलीप शितोळे, तुकाराम साप्ते, श्रीकांत राऊत, अंबादास शेळके, प्रदीप पवार, प्रवीण शेळके, निलेश भुसारे, संदीप भुसारे, अमोल पवार यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवी प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्था, चिखली यांच्या वतीने करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!