Advertisement Advertisement

“‘माझ्याकडे जमीन, टिप्पर आणि कार आहे! तू माझ्या सोबत आली नाही तर बाप-भावाला संपवीन’… धमकी देत मुलीचा छळ!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):मोताळा तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन युवतीला धमकी देऊन जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी गोकुल ज्ञानदेव दिवाने (वय २२, रा. खैरा ता. नांदुरा) याच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ एप्रिलपूर्वी मोताळा येथील स्व. बबनराव देशपांडे विद्यालय रोड तसेच तिघ्रा परिसरात घडली. संबंधित अल्पवयीन युवती ही मोताळा येथे असताना आरोपी तिच्या जवळ येऊन तिला थांबवत “माझ्यासोबत आली नाहीस तर तुझ्या भावाला व वडिलांना जीवे मारून टाकीन” अशी धमकी दिली. त्यानंतर तिचा हात धरून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवले.

काही अंतरावर गेल्यानंतर युवतीने खाली उतरवण्याची विनंती केली असता आरोपीने तिचा विनयभंग केला. तसेच ही घटना कुणाला सांगितल्यास सर्वांना ठार मारण्याची धमकीही दिली.

दरम्यान, आरोपीने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत “माझ्याकडे जमीन, टिप्पर आणि कार आहे” असे सांगून फूस लावण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने २३ एप्रिल रोजी रात्री बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून २३ एप्रिल रोजी अटक केली. २४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!