गावात जाण्याचं सांगून विवाहितेची दोन चिमुकल्यांसह बेपत्ता; मलकापूर शहरात खळबळ…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मुलांच्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी सामान आणण्यासाठी गावात जाते, असे सांगून घरातून निघालेली विवाहीता आपल्या दोन लहान मुलांसह बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शहरातील हनुमाननगर रोडवरील राठी अपार्टमेंटमध्ये राहणारे वसंतकुमार कांतीलाल पटेल यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी सौ. मित्तल वसंतकुमार पटेल (वय ३३) ह्या ३१ जानेवारी रोजी मुलगी कु. सिया पटेल (वय ११) व मुलगा देवांश पटेल (वय ८) यांना सोबत घेऊन मुलांच्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी गावात जात असल्याचे सांगून घरातून निघाल्या होत्या.

मात्र त्या उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नातेवाइकांकडे तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेतला, तरीही विवाहीता व दोन्ही मुलांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर पतीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बेपत्त्याची तक्रार दाखल केली.

बेपत्ता विवाहितेचे वर्णन…

सौ. मित्तल पटेल यांचा रंग गोरा, उंची सुमारे ५ फूट, केस काळे व लांब असून अंगात फिकट सोनेरी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल आहे. त्यांच्या जवळ दोन हँडबॅग व एक पर्स होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!