Advertisement Advertisement

घरात घुसून नराधमाचा धिंगाणा; शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे माय-लेकीची सुटका, पोक्सोसह गुन्हा दाखल…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : खामगाव शहरातील सतीफैल परिसरात एका संतापजनक घटनेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने एका महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मुलीचा हात पकडून तिला ओढत नेत असताना आईने विरोध केला. त्यावेळी आरोपीने महिलेवरही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत तिचा पदर ओढल्याचा आरोप आहे.

घटनेदरम्यान माय-लेकीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक आणि शेजारी तात्काळ मदतीसाठी धावले. नागरिकांना पाहताच आरोपीचा प्रयत्न फसला आणि माय-लेकीची त्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली.

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे….

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!