Advertisement Advertisement

घरून देवदर्शना साठी सर्व गेले; अन् वापस येताच घरी कार्यक्रम लागेल दिसला….

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जलंब येथील एक कुटुंब वारी हनुमान येथे देवदर्शनासाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ९ जून रोजी भरदिवसा घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

. जाहिरात 👆

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव तालुक्यातील जलंब येथील सोनाबाई हरपालसिंग राजपूत या आपल्या कुटुंबासह वारी हनुमान येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला.

यानंतर चोरट्यांनी घरातील बेडरूममधील लाकडी कपाट फोडून त्यामध्ये ठेवलेली सुमारे ४० ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याची गहूपोत, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने तसेच रोख १ लाख ५० हजार रुपये असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम 331(4) व 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घरफोडी प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!