Advertisement Advertisement

आंब्याच्या झाडाखाली अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पिंपळगाव सराई शिवारातील घटना! मृत महिलेची ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू…

पिंपळगाव सराई (बुलडाणा कव्हरेज न्युज): सैलानी येथून जवळ असलेल्या पिंपळगाव सराई शिवारात एका शेतातील आंब्याच्या झाडाखाली अंदाजे ५० ते ५५ वर्षीय अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना २७ जून रोजी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य तरमळे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना आंब्याच्या झाडाखाली कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी याची माहिती पिंपळगाव सराईचे पोलिस पाटील रामेश्वर गवते यांना दिली. त्यानंतर रायपूर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर जागेवरच डॉ. अक्षय जाधव व गोविंद आसाराम हनवते यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या प्रकरणी रायपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) केली असून, मृत महिलेची ओळख पटविण्यासह मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

या घटनेचा पुढील तपास ठाणेदार निलेश सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!