Advertisement Advertisement

मोठी बातमी! “हिंगोलीत भूकंप, धक्के बुलढाण्यापर्यंत; पहाटे नागरिकांची उडाली झोप!” “रातभर चार धक्के… मेहकर-लोणारातही भूकंपाची चाहूल…!”

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): आज ९ जुलैपहाटे हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यातील काही भागांतही जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. पहाटे अचानक जमिनीला हादरे बसल्याने अनेक नागरिक दचकून घराबाहेर आले.

अधिकृत माहितीनुसार भूकंपाचे एकूण चार धक्के नोंदविण्यात आले. त्यांची तीव्रता अनुक्रमे ४.६, ३.६, ३.९ आणि ४.१ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली येथे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पहिला धक्का रात्री १.३७, दुसरा २.१५, तिसरा २.१७ आणि चौथा ३.२३ वाजता जाणवला.

प्राथमिक माहितीनुसार या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. बुलढाणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, केंद्रबिंदू हिंगोलीत असल्याने मेहकर आणि लोणार परिसरात सौम्य धक्के जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्यास घाबरून न जाता तात्काळ मोकळ्या जागेत जावे. विशेषतः कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने एका वृत्त सोबत शी सांगितलं आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कोणत्याही आपत्तीची माहिती देण्यासाठी किंवा मदतीसाठी नागरिकांनी ७०२०४३५९५४ या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!