Advertisement Advertisement

“काझींची चर्चा होती जोरात, पण तिकीट गेलं सिद्दीकींकडे!” तिकीट वाटपावरून राष्ट्रवादीत नाराजी; सिद्दीकींच्या नावावर शिक्कामोर्तब, काझी समर्थक नाराज….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटप निश्चित होत असताना, अजित पवार गटाकडे एक जागा मजबूत मानली जात होती. मात्र या जागेसाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

या आधी जिल्ह्यातून अॅड. नाझेर काझी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. काझी यांना उमेदवारी मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्नही करण्यात आले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी अखेर सिद्दीकी यांच्या नावाला पसंती दिल्याने काझी समर्थकांमध्ये असंतोष पसरला आहे.

दरम्यान, आज ३० एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते मकरंद आबा पाटील हे बुलढाणा दौऱ्यावर असून, सायंकाळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी उघडपणे व्यक्त होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!