Advertisement Advertisement

दारू पिऊन घरी आल्यावर स्वतःच्या आई सोबत धिंगाणा घातला! तू चांगलं जेवण बनवत नाही; अस म्हणत काठीने बेदम मारहाण केली….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): “तू जेवण चांगले बनवले नाही,” या क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या मुलाने स्वतःच्या ७५ वर्षीय वृद्ध आईवर काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे घडली. या प्रकरणी जखमी वृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल दिनकर खिल्लारे हा दारूच्या नशेत घरी आला. जेवणाच्या कारणावरून त्याने आई शोभा दिनकर खिल्लारे (वय ७५) यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घरातील इतर सदस्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापाच्या भरात आरोपीने घरातील काठी उचलून आईच्या कपाळावर जोरदार प्रहार केल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात शोभा खिल्लारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच डाव्या डोळ्याजवळ, उजव्या पायाच्या पंजाला आणि पाठीवरही मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

या घटनेनंतर जखमी शोभा दिनकर खिल्लारे, रा. देऊळगाव मही यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमोल दिनकर खिल्लारे याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार कलीम देशमुख करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!