Advertisement Advertisement

FDAआयुक्त तुकाराम मुंडे साहेब सिर्फ नाम काफी है! “FDA च्या धाडीची नुसती चर्चा… अन् चिखली , देऊळगाव राजा, मेहकर,सुलतानपूर-लोणारची हॉटेलं, टपऱ्या धाडधाड बंद!”

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात अन्न सुरक्षा व स्वच्छतेबाबत कठोर मोहीम सुरू केल्याने अनेक ठिकाणी खाद्य व्यवसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच लोणार तालुक्यात FDA चे पथक तपासणीसाठी दाखल होणार असल्याची चर्चा शुक्रवारी वाऱ्यासारखी पसरताच चिखली , देऊळगाव राजा, मेहकर, सुलतानपूरसह लोणार परिसरातील अनेक हॉटेल्स, मिठाई दुकाने, पानटपऱ्या व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांनी घाईघाईने शटर डाउन केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सकाळपासूनच “FDA ची धाड कुठेही पडणार” अशी चर्चा बा रंगली. या चर्चेचा परिणाम इतका मोठा झाला की, नेहमी ग्राहकांनी गजबजलेली चिखली , देऊळगाव राजा, मेहकर, सुलतानपूरची मुख्य बाजारपेठ काही तासांतच ओस पडली. अनेक व्यावसायिकांनी कोणतीही जोखीम न घेता दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने परिसरात दिवसभर शुकशुकाट पसरला होता.

धाडीपेक्षा चर्चेचीच जास्त धास्ती!

विशेष म्हणजे, FDA चे पथक प्रत्यक्षात लोणार,चिखली, देऊळगाव राजा, मेहकर,तालुक्यात दाखल झाले होते की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती. मात्र केवळ कारवाईच्या चर्चेनेच व्यापाऱ्यांची झोप उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे “सगळे व्यवहार नियमांनुसार असतील तर तपासणीच्या नावाने एवढी भीती कशाची?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

या घटनेमुळे अनेक खाद्य व्यवसायांमध्ये अन्न सुरक्षा नियम, स्वच्छता निकष, परवाने आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कितपत गांभीर्याने काम केले जाते, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्राहकांची मात्र गैरसोय….

दुकाने अचानक बंद झाल्यामुळे प्रवासी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना चहा, नाश्ता तसेच इतर खाद्यपदार्थांसाठी मोठी भटकंती करावी लागली. अनेक ठिकाणी ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागल्याचेही दिसून आले.

नियमित तपासणीची जोरदार मागणी….

या प्रकारानंतर नागरिकांकडून अन्न व औषध प्रशासनाने तालुक्यातील हॉटेल्स, स्वीटमार्ट, बेकरी, पानटपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्वच्छता, वैध परवाने, खाद्यपदार्थांचा दर्जा आणि कालबाह्य वस्तूंची विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!