Advertisement Advertisement

धक्कादायक! शिक्षिकेचा पाठलाग करत मोबाईल नंबरची मागणी; चिखलीतील तरुणावर गुन्हा दाखल…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरत मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी चिखली शहर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (३० जुलै) सकाळी सुमारे ८.४५ ते ८.५० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी शिक्षिका शाळेकडे जात असताना आरोपी अकील अहमद अब्दुल अहमद (रा. चिखली) याने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर, “तुम्ही मला खूप आवडता, मला तुमच्याशी बोलायचे आहे,” असे म्हणत त्याने शिक्षिकेकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने चिखली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा क्रमांक ६४३/२०२६ नोंदवत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भूषण गावंडे व पोलीस उपनिरीक्षक सुसर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास चतरकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!