Advertisement Advertisement

प्रेमासाठी घराला रामराम! २१ वर्षीय तरुणी प्रियकरासोबत फरार; ५० हजारांची रोकड अन् आईचे सोन्याचे दागिनेही घेऊन गेल्याची तक्रार…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):
खामगाव तालुक्यातील आवार येथील एका २१ वर्षीय तरुणीने प्रियकरासोबत घरातून निघून गेल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, घरातून जाताना संबंधित तरुणीने घरातील सुमारे ५० हजार रुपयांची रोकड तसेच आईचे सोन्याचे दागिनेही सोबत नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.


याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर त्यांनी स्वतःही मुलीचा शोध घेतला. चौकशीदरम्यान संबंधित तरुणी ही घाटपुरी नाक्याजवळ राहणाऱ्या श्रेयश श्रीकृष्ण घ्यार या तरुणाच्या रूमवर असल्याची माहिती त्यांना मिळाली.


या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, तक्रारीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. तरुणी स्वतःच्या इच्छेने गेली की अन्य काही कारण आहे, तसेच रोकड व दागिन्यांबाबतचे आरोप कितपत सत्य आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.


दरम्यान, या घटनेची चर्चा आवार परिसरासह खामगाव तालुक्यात रंगली असून, पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!