देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील निमगाव गुरू येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा विषारी द्रव प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दामोधर गोपाल चित्ते यांनी बुधवारी दुपारी अज्ञात कारणातून विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाईकांनी तातडीने त्यांना देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय-कायदेशीर अहवालाच्या आधारे देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, विषारी द्रव प्राशन करण्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.














