Advertisement Advertisement

निंबाच्या झाडावरून पडल्याने ६१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील दुधलगाव येथे शेतातील निंबाच्या झाडावरील फांदी तोडत असताना खाली पडून ६१ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १० जून रोजी सकाळी घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधलगाव येथील प्रमोद श्रीधर देशमुख (वय ६१) हे १० जून रोजी सकाळी सुमारे ७ वाजताच्या दरम्यान त्यांच्या शेतातील निंबाच्या झाडावरील फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढले होते. यावेळी तोल जाऊन ते खाली पडले. पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत समीर प्रमोद देशमुख (रा. दुधलगाव, ता. मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १८/२०२६ अन्वये कलम १९४ बीएनएसएसनुसार नोंद करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सविता मोरे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!