Advertisement Advertisement

दारू गाळायचा कारखानाच उघडला होता; पोलिस धडकले अन् सगळा खेळ संपला!”

रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मातला शिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायावर रायपूर पोलिसांनी सोमवारी (दि. ८) धडक कारवाई करत २५ लिटर गावठी दारू आणि ७०० लिटर मोह सडवा जप्त केला. या कारवाईत एकूण ३८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मातला शिवारात मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती रायपूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार आशिष काकडे, पोलिस अंमलदार राहुल जाधव व दशरथ जवादे यांच्या पथकाने परिसरात छापा टाकला.

या कारवाईदरम्यान सिकंदर अशराफ बरडे (वय ६१) आणि रज्जाक शब्बीर बरडे (वय ४५, दोघेही रा. मातला) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करत २५ लिटर तयार गावठी दारू तसेच ७०० लिटर मोह सडवा जप्त केला.

कारवाईदरम्यान हस्तगत करण्यात आलेला एकूण ३८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही रायपूर पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!