Advertisement Advertisement

“राजर्षी शाहूचा वरवट बकालात दमदार ग्राहक मेळावा; शेतकऱ्यांच्या बांधावरच विकास नेण्याचा संदीप शेळकेंचा शब्द!”

वरवट बकाल (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : घाटाखालील भागातील कृषी आधारित प्रकल्पांना भविष्यात अधिक बळ देऊन शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.

तालुक्यातील वरवट बकाल येथे राजर्षी शाहू मल्टिस्टेट शाखेचा ग्राहक मेळावा ३० मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक मान्यवर उपस्थित होते. मंचावर संग्रामपूरचे ठाणेदार बोपटे, सरपंच प्रतिभा इंगळे, शुद्धोधन इंगळे, राम वनारे, श्याम कौलकर, स्वप्नील देशमुख, उपा धुळे, बळीराम धुळे, मनोज वाघ, सुभाष बकाल, बाळू ढोकणे, संदीप माठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संदीप शेळके यांनी राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या विविध उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, संस्थेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत काम केले आहे. कोल्ड स्टोअरेज, ग्रीन गोदाम प्रकल्प, संत्रा प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खत वाटप, शेतकरी मार्गदर्शन शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच विविध जनहिताचे उपक्रम राबवून संस्था समाजाशी घट्टपणे जोडली गेली आहे.

कार्यक्रमात दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणारी श्रुती चंद्रकांत ढोकणे व श्रेयस निवृत्ती बकाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एकलारा येथील महिला बचत गटांना कर्जवाटपाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राजर्षी शाहू पतसंस्थेने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करून केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सेवानिवृत्त मुख्याध्यापक भोंडे यांनी केले. कार्यक्रमाला संचालक मंडळ, खातेदार, ग्रामस्थ यांच्यासह सर्वव्यवस्थापक दिलीप चव्हाण, विभागीय व्यवस्थापक सतीश बकाल, शाखा व्यवस्थापक आढाव, अश्विन परदेशी आदींची उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!