Advertisement Advertisement

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी बुलढाण्यात शिवसेना (उबाठा)चे आंदोलन; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध! जयस्तंभ चौकात घोषणाबाजी; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवारी (२२ जुलै) बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन उग्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले.

या आंदोलनात पक्षाच्या प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि सहसंपर्कप्रमुख डी.एस. लहाने यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, युवक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने पारदर्शक व जबाबदार भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!