साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): २० जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास २१ वर्षीय तरुणी महाविद्यालयातून टीसी (ट्रान्सफर सर्टिफिकेट) आणण्यासाठी जाते, असे सांगून घरातून निघाली. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही.
तरुणी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा नातेवाईक तसेच परिसरात शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात धाव घेत तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून, पोलीस बेपत्ता तरुणीचा शोध घेत आहेत. तरुणीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास साखरखेर्डा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












