Advertisement Advertisement

“सायंकाळी दुकानात कुरकुरे आनते म्हणत घराबाहेर पडली अन्‌ पोरीच गायब झाली!”

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :तालुक्यातील रिधोरा जहागीर येथे २३ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिधोरा जहागीर येथील रेखा सुनील वाकोडे (वय ४५) यांनी १८ मे रोजी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यांची मुलगी नेहा सुनील वाकोडे (वय २३) ही १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास “दुकानातून कुरकुरे आणते” असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी परतली नाही.

कुटुंबीयांनी गावात तसेच परिसरात शोध घेतला, मात्र नेहा आढळून आली नाही. त्यामुळे अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली. बेपत्ता युवतीचा रंग सावळा, उंची अंदाजे ४ फूट ५ इंच, बांधा सडपातळ असून अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात काळ्या रंगाच्या सँडल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मिसिंग दाखल केली असून पुढील तपास एएसआय अशोक आडोकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!