Advertisement Advertisement

धक्कादायक!खामगावात रागाच्या भरात निर्दयी पतीकडून पत्नीची लोखंडी रॉडने हत्या; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात…

खामगाव(बुलडाणा कव्हरेज नुज): खामगावात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.पतीने आपल्या पत्नीची लोखंडी रॉडने ठेचून हत्या केली आहे.

होय खामगावात पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना १५ मे च्या मध्यरात्री उघडकीस आली आहे. खामगाव शहरातील रेल्वे गेट परिसरात राहणाऱ्या पत्नीची रागाच्या भरात पतीने डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केली आहे.सौ सविता प्रकाश सोळंके असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी पती प्रकाश सोळंके यांनी रागाच्या भरात पत्नी सविता सोळंके हिच्याशी वाद घालून तिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारून तिला गंभीर जखमी केली आहे.यामध्ये सविता सोळंकी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पती प्रकाश सोळंके याला अटक केली आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!