Advertisement Advertisement

भामट्या देराची वहिनीवर वाईट नजर; हात पकडून ओढण्याचा प्रयत्न..!

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील एका गावात दिरानेच विधवा वहिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणार पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या पतीचे २०१६ मध्ये निधन झाले असून, ती आपल्या मुलांसह गावात राहून कष्टाने संसाराचा गाडा हाकत आहे. कौटुंबिक कारणांवरून तिचा दीर नामदेव इंगळे याच्यासोबत पूर्वीपासून वाद सुरू होता.

तक्रारीनुसार, १० मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास महिला गावातील किराणा दुकानातून सामान घेऊन घरी परतत होती. त्यावेळी आरोपीने तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. तसेच जबरदस्तीने ओढत नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करताच आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी लोणार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ (१), ७८ (२), ११५ (२) आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!