Advertisement Advertisement

चालत्या रेल्वेत त्याचा तोल गेला आणि तो खाली फेकला गेला; अपघात एवढा भयानक होता की….

चांडोळ(बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील २५ वर्षीय युवकाचा चालत्या रेल्वेतून तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना ८ मे रोजी लासूर रेल्वे स्टेशन परिसरात घडली. मृत युवकाचे नाव राहुल रमेश शेळके (वय २५) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शेळके हा आपल्या बहिणीला मनमाड-नाशिक येथे रेल्वेत बसवून घरी परतत होता. त्याचे भाऊजी बाहेर राज्यात सैन्य सेवेत असल्याने बहिणीला सोडण्यासाठी राहुल गेला होता. मात्र परतीच्या प्रवासादरम्यान लासूर रेल्वे स्टेशन परिसरात चालत्या रेल्वेत त्याचा तोल गेला आणि तो खाली फेकला गेला.

हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पोहोचताच शेळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चांडोळ गावावर शोककळा पसरली आहे.

तरुण वयात राहुलच्या झालेल्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, एका कुटुंबाचा आधार हरपल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!