Advertisement Advertisement

विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या; त्रास देणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल…

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): पैशांच्या व्यवहारातून सुरू झालेल्या वादातून एका विवाहितेला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मेरा खुर्द येथील मुळार शाह अकबर शाह (वय ५४) यांनी ७ मे रोजी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार, फिर्यादी यांना तीन मुली व दोन मुले असून त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी रुबीनाबी अकिलशाह (वय ३३) हिचा विवाह चिखली येथे झाला होता. तिचा संसार सुखाने सुरू होता.

दरम्यान, रुबीनाबीच्या घरासमोर राहणाऱ्या शगुप्ता फकीरा शेख हिला दोन वर्षांपूर्वी आरोपी मुनव्वर सुलताना सलीम खान हिने ३० हजार रुपये दिले होते. या व्यवहारात रुबीनाबी मध्यस्थ होती. मात्र, शगुप्ताने पैसे परत न केल्याने मुनव्वर सुलताना हिने रुबीनाबीवर पैशांसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

तक्रारीनुसार, आरोपी महिला रुबीनाबीला वारंवार धमकावत होती. “तू मध्यस्थी केली आहेस, त्यामुळे तूच माझे पैसे दे. पैसे दिले नाहीत तर तुला व तुझ्या मुलांना घराबाहेर काढीन, घराला कुलूप लावीन, तसेच तुला जिवे मारीन,” अशी धमकी देत ती मानसिक छळ करत होती.

या सततच्या त्रासाला कंटाळून रुबीनाबी अकिलशाह हिने ६ मे रोजी दीपक खरात यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार व डायरी अंमलदार यांनी आरोपी मुनव्वर सुलताना सलीम खान हिच्याविरुद्ध कलम १०८ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!