Advertisement Advertisement

केळवदजवळ भीषण अपघात…! सवणाच्या होमगार्ड यांचा जागीच मृत्यू…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातल्या केळवद गावाजवळ आज दि.१३ रोजी एक भारीच भीषण मोटरसायकल अपघात झाला. यात सवणा गावचा रहिवासी अन् होमगार्ड विभागात लिपिक म्हणून काम करणारा आत्माराम वखरे यांचा जागीच जीव गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, वखरे हे आपल्या मोटरसायकलवरून जात असताना केळवदजवळ त्यांच्या गाडीला जबर धडक बसली. अपघात एवढा जोरात झाला की त्यांच्या डोक्याला अन् अंगाला भारी मार लागला. त्यामुळे ते जागीच ठार झाले.

घटनेची बातमी कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही लगेच येऊन पंचनामा सुरू केला. वखरे हे होमगार्ड खात्यात लिपिक म्हणून काम करत होते, त्यामुळे त्यांच्या निधनाने विभागातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

वखरे यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे सवणा गावावर दुःखाचं सावट पसरलं असून गावात शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!