Advertisement Advertisement

घराबाहेर झोपलेली होते चोर आले काळया रुमाल्याने तोंड दाबलं आणि चाकूचा धाक दाखवून…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज)अंढेरा जवळील शेत परिसरात मंगळवार (१७ मार्च) रात्री धाडसी दरोड्याची घटना घडली. अज्ञात ४ चोरट्यांनी शेतातील दोन घरांवर हल्ला करत कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवून सुमारे ७ लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त ग्रामसेवक दत्तू विष्णू खरात व सेवानिवृत्त तलाठी यांच्या कुटुंबीयांचे गट क्रमांक २११ मधील शेतात वास्तव्य आहे. रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास ४ अज्ञात चोरटे तोंड बांधून घराजवळ आले. त्यांनी घराबाहेर असलेल्या व्यक्तीस चाकूचा धाक दाखवत घर उघडण्यास भाग पाडले. घरात घुसून त्यांनी कुटुंबातील सदस्यांना धमकावत मोबाईल हिसकावले व सुमारे ३० हजारांची रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने लुटले.

यानंतर चोरट्यांनी शेजारील सेवानिवृत्त ग्रामसेवक दत्तू खरात यांच्या घरात प्रवेश केला. तेथेही पत्नी व मुलांना धमकावत मंगळसूत्र, एकदाणी, कर्णफुले, बांगड्या आदी दागिने लंपास केले. दोन्ही घरांतील कुटुंबीयांना काही काळ ओलीस ठेवून चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले.

दरम्यान, एका सतर्क महिलेने प्रसंगावधान राखत गावात फोन करून माहिती दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली. पाठलाग करताना एक आरोपी गावकऱ्यांच्या हाती लागला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!