Advertisement Advertisement

रस्त्यावर माती टाकू नका म्हटलं अन् नातेवाइकांचा पारा चढला! महिलेसह नवऱ्याला भर चौकात शिव्यांची लाखोली,वरून जीवे मारण्याची धमकी; खामगावात नातेवाइकांचाच राडा!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घराकडे येण्या-जाण्याच्या रस्त्यावर माती टाकण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून दोन नातेवाइकांनी एका महिलेसह तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना खामगाव शहरातील भिसे प्लॉट, सिव्हिल लाईन परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी दोन जणांविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भिसे प्लॉट, सिव्हिल लाईन येथील प्रेमलता राजेंद्र भिसे (वय ५६) या घरी असताना जगन्नाथ नथुजी भिसे आणि महेंद्र जगन्नाथ भिसे हे मजुरांच्या मदतीने त्यांच्या घराकडे येण्या-जाण्याच्या रस्त्यावर माती टाकण्याचे काम करीत होते. यावेळी प्रेमलता भिसे यांनी रस्त्यावर माती टाकण्यास विरोध करीत त्यांना तसे करण्यास मनाई केली.

मात्र, याच गोष्टीचा दोन्ही आरोपींना राग आला. त्यांनी संगनमत करून प्रेमलता भिसे आणि त्यांच्या पतीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, ‘तुम्ही येथे कसे राहता ते आम्ही पाहतो. आमच्या वाट्याला गेलात तर तुम्हाला जीवे मारून टाकू,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपींकडून वारंवार शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

१ नोव्हेंबरला घडला प्रकार….

१ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रेमलता भिसे यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी जगन्नाथ नथुजी भिसे आणि महेंद्र जगन्नाथ भिसे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संतोष गायकवाड करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!