देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील मेहुणाराजा येथे दुकानात घुसून एका महिलेला शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना ८ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रिती बाबासाहेब नांदवे (वय २८, रा. दगडवाडी ता. देऊळगाव राजा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून उद्धव उत्तम सुरडकर (वय ३४), धोर्डिंबा सिताराम बनसोडे (वय ३८), अमोल मुर्कीदा बनसोडे (वय २५) आणि संतोष सुरडकर (वय २५, सर्व रा. सुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी प्रिती नांदवे या आपल्या दुकानात बसलेल्या असताना आरोपी तेथे आले. त्यांनी दुकानातच शिवीगाळ सुरू केली. शिवीगाळ करू नका असे सांगितल्यावर वाद वाढला आणि आरोपींनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर आरोपी चारचाकी वाहनाने तेथून पसार झाले. या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.











