Advertisement Advertisement

पेपर देते म्हणत घरून निघाली; कवळा गावची १८ वर्षांची मुलगी बेपत्ता….!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) कवळा येथील एक १८ वर्षीय मुलगी पेपर देण्यासाठी जाते असे सांगून घरातून निघाली, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, पण काहीच पत्ता न लागल्याने अखेर चिखली पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कवळा येथील रहिवासी संजय विठ्ठल साठे (वय ४५) यांची मुलगी साधना संजय साठे (वय १८) ही बारावीची विद्यार्थिनी असून तिचे सध्या परीक्षा सुरू आहेत. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास साधना ही अमडापूर येथे पेपर देण्यासाठी जात आहे असे सांगून घरातून निघाली. मात्र, दिवसभर उलटला, रात्र झाली तरी ती घरी परतली नाही.

कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रमैत्रिणी तसेच परिसरात शोध घेतला, मात्र साधनाचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर वडील संजय साठे यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी मिसिंग दाखल करून शोधमोहीम सुरू केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार भगवान शेवाळे हे करीत आहेत.

युवतीचे वर्णन असे:

साधना साठे – रंग गोरा, उंची साधारण ५ फूट, शरीर बांधा मजबूत, केस लांब. अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप व लेगिज, त्यावर भगव्या रंगाची ओढणी आणि पायात लाल रंगाची सँडल घातलेली आहे.

दरम्यान, या वर्णनाची युवती कुठेही आढळून आल्यास त्वरित चिखली पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!