मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर शहरातील रोहीदास नगर परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा तिच्या राहत्या घरात मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वार्ड क्रमांक १६, रोहीदास नगर येथे कुटुंबासोबत राहणारी यशश्री मनोज शिरे (वय २२) ही घरी एकटी असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे. कुटुंबीय घरी परतल्यानंतर प्रकार लक्षात आला.
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी प्रविण डिगांबर शिरे (वय ४६) यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सध्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पुढील तपास पोलीस अंमलदार सदानंद चाफले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













