Advertisement Advertisement

१६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अपहरणाचा संशय…! बुलढाणा ग्रामीण पोलिसांत तक्रार, परिसरात खळबळ….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील एका गावातील रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी सोनू (नाव बदललेले आहे) (वय १६ वर्षे ९ महिने), इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असून ती २३ जानेवारी रोजी रात्री सुमारे ९ वाजता घरातून बेपत्ता झाली.

तक्रारदार व त्यांची पत्नी हे २३ जानेवारीच्या रात्री शेतातील गटाराला पाणी देण्यासाठी गेले होते. त्या वेळी घरात इतर मुले झोपलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ८ वाजता घरी परतल्यानंतर त्यांची लहान मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी व गाव परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला; मात्र मुलगी आढळून न आल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारीनुसार, २३ जानेवारी रात्री ९ ते २४ जानेवारी सकाळी ८ या कालावधीत अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून मुलीचा कसून शोध सुरू आहे.

दरम्यान, सदर मुलीबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!