बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात अवघ्या ४८ तासांत तब्बल ६ महिला व मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. २५ व २६ मे २०२६ या दोन दिवसांत विविध पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या असून, या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, बेपत्ता झालेल्यांमध्ये १९ ते २३ वयोगटातील पाच तरुणींचा तसेच ८८ वर्षीय वृद्ध महिलेचाही समावेश आहे. खामगाव, चिखली, मोताळा, सोनाळा आणि हिवरखेड परिसरातील या घटना असल्याने पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे.
बेपत्ता झालेल्यांची माहिती
– अश्विनी सुधाकर हागे (२१)
रा. बावनबीर, सोनाळा
– कु. मालू संतोष अडागळे (१९)
रा. हिवरखेड, ता. खामगाव
– सौ. पायल ओम पुरी (२३)
रा. पिंपळगाव राजा रोड, घाटपुरी, ता. खामगाव
– शारदा संजय गव्हाळे (२३)
रा. तालखेड-बोराखेडी, ता. मोताळा
– श्वेता सुरेश सिरसाट (२२)
रा. बस स्टँड परिसर, चिखली
– नर्मदा राजाराम ठेंग (८८)
रा. मकरध्वज खंडाळा, ता. चिखली
पोलीस ठाणेनिहाय नोंदी…
– शिवाजी नगर पोलीस स्टेशन – २ प्रकरणे
– चिखली पोलीस स्टेशन – २ प्रकरणे
– सोनाळा पोलीस स्टेशन – १ प्रकरण
– हिवरखेड पोलीस स्टेशन – १ प्रकरण
– बोराखेडी पोलीस स्टेशन – १ प्रकरण
नागरिकांमध्ये चिंता…
अवघ्या दोन दिवसांत सलगपणे समोर आलेल्या या घटनांमुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः तरुणी बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व इतर तांत्रिक बाबींची पडताळणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांचे आवाहन….
वरील महिलांपैकी कोणाबाबतही कुणाला माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ ११२ हेल्पलाईन किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.













