मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंत्री खेडेकर येथील २३ वर्षीय तरुण घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्यानंतर तो परत न आल्याने अंढेरा पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत जनाबाई अंबादास आव्हाड (वय ५०, रा. अंत्री खेडेकर) यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा खंडू अंबादास आव्हाड (वय २३) हा २ जून रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास गावातील चतुर एकनाथ आव्हाड याच्यासोबत घरासमोर गप्पा मारत बसला होता. काही वेळाने चतुर आव्हाड हा आपल्या घरी निघून गेला. मात्र खंडू आव्हाड हा त्यानंतर घरात परतलाच नाही.
सायंकाळपर्यंत मुलगा घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर जनाबाई आव्हाड यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून अंढेरा पोलिसांनी ४ जून रोजी मिसिंगची नोंद केली आहे.
हरविलेल्या खंडू आव्हाड याचा रंग सावळा, उंची सुमारे ५ फूट ५ इंच असून केस लांब आहेत. अंगात लाल रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व फिकट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट होती. त्याच्याकडे रेडमी कंपनीचा विनासिम मोबाईल होता. उजव्या हातात काळ्या रंगाचा धागा असून डाव्या हाताच्या मनगटावर “Mom-Dad” असे गोंदलेले आहे.
सदर वर्णनाचा तरुण कोणाला आढळल्यास अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे किंवा बिट जमादार पोफळे यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास अंढेरा पोलिस करीत आहेत.












