Advertisement Advertisement

“कॉलेजला जाते सांगून घराबाहेर पडलेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; मलकापूर ग्रामीण पोलिसांत मिसिंग दाखल…

मलकापूर (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : मलकापूर येथे कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली नांदुरा तालुक्यातील विटाळी येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटाळी येथील संजय भास्कर झनके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी कु. स्नेहल संजय झनके (वय १९) ही २ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता मलकापूर येथील सरस्वती कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही.

कुटुंबीयांनी तिचा कॉलेज परिसर, आजूबाजूची गावे तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी मिसिंग क्र. १३/२०२६ नोंदविला असून पुढील तपास बिट अंमलदार पोहेका रघुनाथ जाधव करीत आहेत.

बेपत्ता तरुणीचा रंग गोरा, उंची सुमारे ५ फूट, बांधा सडपातळ, केस काळे व लांब असून, ती घरातून निघताना पोपटी रंगाचा टॉप, पांढऱ्या रंगाची लेगी आणि साधी चप्पल परिधान केली होती.

अशा वर्णनाची तरुणी आढळून आल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा मलकापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!